Ad will apear here
Next
‘राष्ट्रवादीचे पुणे येथे होणारे राष्ट्रीय संमेलन रद्द’
पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २३, २४ जून रोजी पुणे येथे होणारे राष्ट्रीय संमेलन रद्द करण्यात आले आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

१० जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन आणि पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल सांगता सभा पुणे येथे मोठया उत्साहात पार पडली; मात्र राष्ट्रीय सरचिटणीस टी. पी. पिंताबरम यांनी हे संमेलन रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. काही दिवसांतच या संमेलनाचे ठिकाण जाहीर करण्यात येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. उर्वरित लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. नावे जाहीर करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षांमध्ये बाबाजी जाधव (रत्नागिरी), प्रमोद घोसाळकर (रायगड), अनंत सुतार (नवी मुंबई), प्रकाश दुबोले (मिरा-भाईंदर), सुनील भुसारा (पालघर), प्रदीप गारटकर (पुणे ग्रामीण), सुनील माने (सातारा), विलासराव शिंदे (सांगली ग्रामीण), दीपक ऊर्फ आबा सांळुखे-पाटील (सोलापूर ग्रामीण), मनोज मोरे (धुळे शहर), किरण शिंदे (धुळे ग्रामीण), राजेंद्र गावित (नंदुरबार), डॉ. निसार देशमुख (जालना), आमदार राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद), मकरंद सावे (लातूर शहर), बाबासाहेब पाटील (लातूर ग्रामीण), अॅड. नाझीर काझी (बुलढाणा), राजकुमार मुलचंदानी (अकोला शहर), राजेंद्र महल्ले (अमरावती शहर), सुनील वऱ्हाडे (अमरावती ग्रामीण), नील राऊत (वर्धा), अनिल अहिरकर (नागपूर शहर), नाना पंचबुद्धे (भंडारा), पंचम बिसेन (गोंदिया).

या पत्रकार परिषदेला पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, आमदार विद्या चव्हाण उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZSBBP
Similar Posts
नवाब मलिक यांचे बापट यांच्यावरील आरोप मागे पुणे : तूरडाळ प्रकरणात गिरीश बापट यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मागे घेतला आहे.
‘राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम’ मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन १० जूनला पूणे येथे होत असून, त्यानिमित्त राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभाही याचदिवशी पार पडणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
‘...तर राहुल गांधींना विरोध करण्याचा अधिकार नाही’ मुंबई : ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये सांगितले की, त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील त्यावेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी घेईन. देशातील जनता त्यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी देणार असेल आणि तसा कौल घेणारच आहेत, तर त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी
भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा मुंबई : महाराष्ट्रात होत असलेल्या विधानपरिषदा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचारामध्ये जोरदार मुंसडी मारली असून, विधानपरिषदांच्या निवडणुकीनंतर आता भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रचारात आजपासून (ता. २२) उतरणार असून, त्यांच्या तोफा धडाडणार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language